राष्ट्रीय युवा दिवस
दि.12/01/25
नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात राष्ट्रीय युवा दिवस म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शतकानुशतके आपल्या भारत भूमीवर महान थोर पुरुष निर्माण होत आले आहे. विश्वविचाराच्या क्षितिजावर उदयास आलेला तेजस्वी आणि स्वयंप्रभा तारा म्हणजे स्वामी विवेकानंद. यांची जयंती 12 जानेवारीला सर्वत्र राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी यावलकर, हायस्कूल प्रभारी श्रीमती कीर्ती बल्की व ज्युनियर कॉलेज प्रभारी श्रीमती कांचन चौधरी यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यश मानमोडे (वर्ग अकरावी अ) यांनी मूर्ती पूजेचे महत्व आपल्या कथेतून स्पष्ट केले तर अनुग्रह नारनवरे (11 वा बी ) याने आईची महती कथेद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. जागतिक इतिहास, संस्कृत, तत्वज्ञान या विषयांचा स्वामी विवेकानंद यांनी अभ्यास केला होता. ते विवेकवादाचा पुरस्कार करणारे असल्यामुळे विवेकवादाने माणूस समृद्ध होतो अशी त्यांची धारणा होती. तो सत्यापर्यंत पोहोचू शकतो. या त्यांच्या सिद्धांतावरून पुढे लोक त्यांना स्वामी विवेकानंद म्हणू लागले. विश्वबंधुत्वाचा महान संदेश देणारे स्वामी विवेकानंद म्हणतात देशाच्या प्रगतीसाठी मला शंभर तरुण/ युवा द्या . त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या स्वप्नातील युवा होण्याचा प्रयत्न करू या . व्यक्तीने आजीवन विद्यार्थी रहावे म्हणजे सतत शिकत रहावे . अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे, या उक्तीचे समर्थन करीत कुमारी अंजली भोयर ( 11सी) हिने संचालन व आभाराची कामगिरी पार पडली . सर्व विद्यार्थी व शिक्षक गण कार्यक्रमास उपस्थित होते .
0 Comments