CLICK HERE TO WATCH COMPLETE VIDEO |
नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . मतदान जागृती करण्याबाबत पालक सभेचे आयोजन करण्यात आले . हायस्कूल इन्चार्ज सौ कीर्ती बल्की यांनी मतदान जागृती बद्दल मार्गदर्शन करून येत्या वीस तारखेला आपले मतदान किती महत्त्वपूर्ण आहे याचे महत्त्व पटवून दिले . मतदानाबद्दल विद्यार्थ्यांना महत्त्व व जागृती यासाठी प्रतिज्ञा घेण्यात व देण्यातआली . सौ साधना पांडे यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले तसेच शालेय भोवताल परिसरातील जनतेच्या जागृतीसाठी मतदानावर आधारित नारे देत ,घोषणा करत विद्यार्थ्यांद्वारे प्रभात फेरी काढण्यात आली .या सर्व कार्यक्रमांमध्ये शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी उत्साहाने भाग घेतला.
***********************************************************************************
0 Comments