मराठी भाषा गौरवदिन अन् मराठी राजभाषा दिन फरक माहितीये? जाणून घ्या
मराठी भाषेला फार जूनी परंपरा आणि वारसा आहे. तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. मराठी भाषेची फक्त लोकप्रियता नाही तर प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातही भाषा वाढत गेली. त्याचीच परिणीती हा दिवस आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. पण काही लोक याला मराठी राजभाषा दिन म्हणतात. पण मराठी राजभाषा दिन १ मे आहे. या दोन्ही दिवसांत नेमका फरक काय, जाणून घेऊया.
मराठी भाषेचे वैशिष्ट्ये
- मराठी भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे.
- जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी १५ वी भाषा आहे. तर भारतातली तिसरी भाषा आहे.
- महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत भाषा.
- मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा.
कुसुमाग्रजांचे मराठीतले योगदान
कविवर्य कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित करण्यात आला होता.
कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
कुसुम हे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव होते. कुसुमाग्रजांनी आपल्या बहिणीच्या नावावरूनच आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले.
कुसुमाग्रांच्या आत्मत्यागी तेज आणि मिलनसार भावनिक लेखनामुळे त्यांचे लेख हे जागतिक दर्जाचे झाले.
मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरवदिनातील फरक
- १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य बनले. मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले. तेव्हापासून, १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- १ मे या एकाच दिवशी मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनही साजरा होत होता.
- +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
- marathi #marathi #maharashtra #pune #mumbai #love #ig #marathistatus #status #marathimulgi #marathimulga #india #instagram #punekar #maratha #nashik #kolhapur #instagood #marathijokes #satara #marathipost #mimarathi #marathimeme #photography #marathikavita #trending #marathimotivational #shivajimaharaj #attitude #bhfyp #follow
0 Comments