UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

वृक्षारोपण कार्यक्रम

 शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालकवर्ग व शिक्षक यांच्या मदतीने शालेय आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पार पाडली. वृक्षारोपणासाठी जवळच्या नर्सरीतून विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती. सुरवातीला मुख्याध्यापकांनी एका झाडाचे रोपन केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मैदानात रोपांची लागवड  केली. निसर्गप्रेमी शिक्षक श्री कराडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे व पर्यावरणाची जोपासना करावी असे आवाहन केले. यावेळी वृक्ष संवर्धन व वृक्षांना कुंपण, पाणी याबाबतचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थी, कर्मचारीगण या वृक्षांची देखभाल करण्यासाठी सतत प्रयत्न करतात. यानिमित्ताने वर्ग नववीची विद्यार्थीनी भक्ती कुंभारे हिने वृक्षांचे महत्त्व सांगणारी कविता सादर केली.





Post a Comment

0 Comments