UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

पालक शिक्षक सभा व माता पालक संघ स्थापना -2023-24

 

CLICK HERE TO WATCH

पालक शिक्षक सभा व माता पालक संघ स्थापना -2023-24


नागपूर शिक्षण मंडळाद्वारे संचालित श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात पालक शिक्षक सभा व माता पालक संघाचे आयोजन शनिवारी सकाळी 9:00 वाजता शाळेच्या दिवाणखान्यात करण्यात आले .
प्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी यावलकर तसेच शाळेचे अन्य प्रभारी सौ कीर्ती बल्की , सौ सुषमा पंचभाई , श्री कुंवर  व माजी पालक- शिक्षक सभा व माता - पालक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले . सभेचा उद्देश व कार्य प्रणालीची माहिती प्रास्ताविकातून देण्यात आली . पालक शिक्षक परिचयानंतर सत्र 2023 - 24 च्या पालक - शिक्षक सभा व माता - पालक संघाचे उपाध्यक्ष आणि सचिव पदाची निवड करण्यात आली .
पालक - शिक्षक सभेच्या उपाध्यक्षपदी श्री दुर्गेश वंजारी तर सचिव पदी श्री नितीन यटकरलेवार यांची निवड करण्यात आली . तसेच माता - पालक संघाचे उपाध्यक्षपदी सौ सुचिता अग्रवाल तर सचिव पदी सौ भारतीय उमरेडकर यांची निवड करण्यात आली . सर्व नवनिर्वाचित मान्यवरांचे अधिकाऱ्याद्वारे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
नवनिर्वाचित मान्यवर व पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी आपल्या मार्गदर्शनातून पालक - शिक्षक - विद्यार्थी यांचा समन्वय महत्त्वाचा असतो व तो सुरळीतपणे साधला जातो हा विश्वास व्यक्त केला तसेच नवनिर्वाचित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या . शिक्षक प्रतिनिधी श्री . वालदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
   कार्यक्रमाचे संचालन श्रीमती संधू व आभार प्रदर्शन श्री दानव यांनी केले .
 प्रसंगी मोठ्या संख्येने पालक व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून सभा यशस्वीपणे पार पाडण्यात आली .

******************************************************************************* 

parents teacher meeting,parents meeting,meeting her parents,parents teachers meeting,parent teacher meeting,parents,meeting the parents,parents meeting my baby,tips meeting her parents,parents meeting finally,finally parents meeting,parent,types of parents at parent teacher meetings,tips when meeting her parents,tips wehn meeting her parents,teacher meeting with parents,parents teacher meeting video,meeting,esl parent teacher meeting

Post a Comment

0 Comments