शाळेतील निरोप समारंभाच्या निमित्ताने..........
विद्यार्थी मित्रांनो!
आज तुमच्या शालेय जीवनातील निरोपाचा क्षण!
कदाचीत मी माईक समोर उभं राहून तुमच्यासाठी बोलणार नाही म्हणून हे लिखाण....!
खास...फक्त आणि फक्त तुमच्यासाठी!
शैक्षणिक सत्र सुरू झालं तेंव्हापासून तर आतापर्यंत तुम्हाला आम्ही सर्वच शिक्षक विषय शिकवत गेलो. जितकं शिकवायचं तितकं भरपूर आम्ही सर्व शिक्षकांनी शिकविलं आहे.
चांगला अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरं जा. अभ्यास झाला की यश नक्कीच मिळणार याची खात्री बाळगा.
येणार्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा!
मुलांनो!
तुम्ही काय व्हावं? हे मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही जे व्हायचे आहे ते होणारंच आहात. खूपदा तुमच्या इच्छेविरूद्ध तुम्हाला नको ते व्हावे लागणार आहे.हे लक्षात ठेवा.
या जगात तुमच्यासारखं कुणीच नाही. तुम्ही एकमेव आहात. स्वतः काय करू शकतो? माझ्यातल्या क्षमता काय? हे ओळखा. आवडतं ते करण्यापेक्षा जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. तुम्ही आता मोठे झालात. चांगलं काय? वाईट काय? हे तुम्हाला कळायला लागलं आहे. शाळेनी सुद्धा तुम्हाला घडविण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. शाळा ही "संस्काराचं केंद्र" असतं हे लक्षात ठेवा.
पास होणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. पुढे कितीही जरी शिक्षण घेतलं तरी शाळेनी दिलेले संस्कार आयुष्यभर पुरतील.
या क्षणाला तुम्हाला या शाळेत प्रवेश घेतल्यापासूनचे तर आतापर्यंतचे सर्वच क्षण आठवत असतील. शिक्षकांचं रागावणं, शिक्षा करणं सर्व काही अभ्यासक्रमाचाच भाग असतो याची जाणीवही या क्षणाला तुम्हाला झाली असेलंच.
शाळेच्या इवल्याश्या जगातून बाहेर पडणार आहात तुम्ही... एक संवेदनशील मन घेऊन....
या क्षणाला आपण शाळेपासून दुरावणार, इथल्या सर, मॅडम यांच्यासोबतचा सहवास आता कमी होणार याची जाणीवही होत असेल.
मुलांनो!
आता खरंच बाहेर पडा. बाहेरील जग तुमच्या स्वागतासाठी तयार आहे.
मस्त अभ्यास करा. खूप मोठे व्हा. तुमचं यश बघून आम्हाला निश्चितच आनंद होईल.
तुमच्या निरोपाचा हा क्षण मलाही एक भावक्षण वाटतो. असा क्षण की.....ज्या क्षणी आपण भावलिप्त असतांनाही सजग असावे.
बघा तुम्हाला पटतं कां?
Dear Students,
Today is a very important day in your life. We wish you to remember and use all the knowledge that you learned in school. Be positive and calm because today you truely need it.
Best wishes for your exam. We are sure your continuous hard work and determination will shine through your answer script.
खांबाळकर सर
१३.०२.२०२३ करीता.
*******************************************************************************
0 Comments