UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

" माता सुरक्षित तर घर सुरक्षित " क्रमांक -जीपना /शिक्षण /माध्य /लले /८६४३/२०२२



 "  "  *माता सुरक्षित तर घर सुरक्षित*  "

       " *माता सुरक्षित तर घर  सुरभित* "  हा उपक्रम  *नवरात्र उत्सव*  या काळात शिबिराच्या माध्यमातून राबविणे असे शासनाने पत्रकाद्वारे सूचित केले . 

हा उपक्रम राबविण्यामागील महत्त्वाचा हेतू हाच की नवरात्र उत्सव म्हणजे देवीचा . देवीचे नाना अवतार , रूपे आपल्याला याच दिवसांत पाहायला मिळतात.  त्याच देवीचे दुसरे रूप म्हणजे आपल्या घरातील  आई, माता , भगिनी होय . ती *  *सक्षम  ,  सुदृढ , निरोगी आणि कार्यशील*  असेल तर कुटुंब , घर पर्यायाने समाज व देश सुदृढ बनेल व देशाच्या विकासात  मदत होईल  .हाच उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्याचे आयोजित केले गेले  .हा उपक्रम राबवितांना आपल्या शाळेतील शिक्षक , शिक्षकेतर महिला अधिकारी  ,कर्मचारी , माता , भगिनींनी आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक तपासणी करून घ्यावी . ही तपासणी प्रत्येक माता भगिनी पालकाला किती महत्त्वाची आहे हे आमचे विद्यार्थी आपापल्या माता पालकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतील . त्यासाठी ऑनलाईन वर्ग आयोजित केले गेले . त्यात आमच्या शिक्षकांनी माता पालकांचे उद्बोधन करून माता सुदृढ तसेच कार्यक्षम असणे का गरजेचे आहे व त्यासाठी काय काय केले पाहिजे हे समजावून सांगितले. तसेच काही शिक्षकांनी  पालकांना व्यक्तीगत फोन करून माहिती दिली व घराजवळच्या आयोजित केलेल्या शिबिरात आरोग्य तपासणी करवून घेण्यास सांगितले. घरातील स्त्री ही घरातील सर्व सदस्यांची काळजी घेत असते , प्रत्येकाच्या आवडीनिवडींचा विचार करते , हा कार्यभाग करत असताना ती स्वतःला विसरून जाते  .तिला जेवायला देखील वेळ मिळत नाही मग विश्रांतीची उसंत मिळणे हे तर दूरच . सर्व कार्य करीत असतांना स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आमच्या शिक्षकांनी समजावून सांगितले . या  उद्बोधन वर्गानंतर आमचे विद्यार्थी आपल्या माता-भगिनींना  ,शेजारच्या परिसरातील महिला यांना जवळच्या शिबिरापर्यंत पोहोचवण्याची मदत करतील . अशा प्रकारे या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका , सर्व शाखा प्रमुख व सर्व 5 ते 12 या वर्गांना शिकविणा-या शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी करण्यात सहकार्य मिळाले .











Post a Comment

0 Comments