म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती ‘म्हण’ होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.
मराठी म्हणीं
1. अगं अगं म्हशी मला कोठे नेशी
स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2. पी हळद हो गोरी
उतावळेपणा दाखविणे
3. आपला हात जगन्नाथ
आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
4. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
5. अति तेथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
6. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
दोनपैकी एक पर्याय निवडणे
7. आयत्या बिळात नागोबा
दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
8. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
9. उंटावरचा शहाणा
मूर्ख सल्ला देणारा
10. आजीच्या जीवावर बाईजी उदार
दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
11. नाचता येईना अंगण वाकडे
स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
12. आपल्याच पोळीवर तूप ओढणे
फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
13. छत्तीसाचा आकडा
विरुद्ध मत असणे
14. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते
एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
15. तेरड्याचा रंग तीन दिवस
एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
16. आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
17. अडला हरी गाढवाचे पाय धरी
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
18. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
20. आधी शिदोरी मग जेजूरी
आधी भोजन मग देवपूजा
21. दुष्काळात तेरावा महिना
संकटात अधिक भर
22. असतील शिते तर जमतील भुते
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
23. नव्याचे नऊ दिवस
नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
24. आचार भ्रष्टी सदा कष्टी
ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
25. वासरात लंगडी गाय शहाणी
अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
26. आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं
स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
27. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
28. रात्र थोडी सोंगे फार
काम भरपूर, वेळ कमी
29. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते
अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
30 . नाकाचा बाल
अत्यंत प्रिय व्यक्ती
31. अचाट खाणे मसणात जाणे
खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
32. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
दोन्ही बाजूंनी अडचण
33. आलीया भोगाशी असावे सादर
कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
34. आवळा देऊन कोहळा काढणे
क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
35. अंथरूण पाहून पाय पसरावे
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
36. कामापुरता मामा
काम साधण्यापुरते गोड बोलणे
37. आपलेच दात आपलेच ओठ
आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
38. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
39. आईचा काळ बायकोचा मवाळ
आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
40. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
41. अळी मिळी गुप चिळी
रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
42. अहो रूपम अहो ध्वनी
एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
43. इच्छा तेथे मार्
ग एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
44. इकडे आड तिकडे विहीर
दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
45. उठता लाथ बसता बुकी
प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
46. उडत्या पाखरची पिसे मोजणे
अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
47. उधारीचे पोते सव्वाहात रिते
उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
48. उंदराला मांजर साक्ष
वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
49. उचलली जीभ लावली टाळ्याला
विचार न करता बोलणे.
50. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स
51. उथळ पाण्याला खळखळाट फार
थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
52. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
53. एक ना घड भारभर चिंध्या
एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
54. एका माळेचे मणी
सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
55. एका हाताने टाळी वाजत नाही
दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
56.ऐकावे जनाचे करावे मनाचे
लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
57. उंटावरून शेळ्या हाकणे
आळस, हलगर्जीपणा करणे
58. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत
59. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
60. घोडामैदानजवळ असणे
परीक्षा लवकरच होणे
61. ओळखीचा चोर जीवे न सोडी
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
62. कर नाही त्याला डर कशाला
ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
63. कामापुरता मामा
ताकापुरती आजी आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
64. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती
नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
65. कानामगून आली आणि तिखट झाली
मागून येऊन वरचढ होणे.
66. नाव मोठे लक्षण खोटे
कीर्ती मोठी पण कृती छोटी
67. करावे तसे भरावे
जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
68. हपापाचा माल गपापा
लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
69. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी
कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
70. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
71. काठी मारल्याने पानी दुभंगत नाही
रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
72. कडू कारले तुपात तळले
साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
73. कुडी तशी पुडी
देहाप्रमाणे आहार असतो.
74. कधी तुपाशी तर कधी उपाशी
संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
75. कावळा बसायला अन फांदी तुटायला
परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
76. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
77. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी
कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
78. कोल्हा काकडीला राजी क्ष्रुद्र
माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
79. कोरड्याबरोबर ओले ही जळते
निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
80. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही
निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
81. काखेत कळसा नि गावाला वळसा
हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
82. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
83. खाण तशी माती
आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
84. खर्याला मरण नाही
खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
85. खाऊ जाणे ते पचवू जाणे
एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
86. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
87. खाऊन माजवे टाकून माजू नये
पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
88. खोट्याच्या कपाळी गोटा
वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
89. गरजवंताला अक्कल नसते
गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
90. गर्वाचे घर खाली
गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
91. गरज सरो नि वैध मरो
आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
92. गर्जेल तो पडेल
काय केवळ गाजावाजा करणार्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
93. गाढवाला गुळाची चव काय?
मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
94. गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ
मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार
95. गाव करी ते राव ना करी श्रीमंत
व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
96. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
97. गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता
मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
98. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली
एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
99. गाढवाच्या पाठीवर गोणी
एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
100. गुरुची विद्या गुरूला फळली
एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
101. गुळाचा गणपती
गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
102. गोगलगाय नि पोटात पाय
एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
103. गोरागोमटा कपाळ
करंटा दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
104. घर ना दार देवळी बिर्हाड
बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
105. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात
एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
106. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे
स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्यांने आपलेही काम लादणे.
107. घर पहावे बांधून लग्न पहावे करून
अनुभवाने माणूस शहाणा होतो.
108. घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते
आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
109. घरोघरी मातीच्याच चुली
सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
110. घोडे खाई भाडे
धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
111. चढेल तो पडेल
गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
112. चालत्या गाडीला खीळ
व्यवस्थीत चालणार्या कार्यात अडचण निर्माण होणे.
113. चमत्काराशिवाय नमस्कार नाही,
पराक्रमावाचून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
114. चिंती परा येई घरा
दुसर्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
115. चोर सोडून सान्याशाला फाशी
खर्या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
116. चोराच्या उलटया बोंबा
स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर आळ घेणे.
117. चोराच्या मनात चांदणे
वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
118. चोरावर मोर
एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्यावर कडी करणे.
119. जळत्या घराचा पोळता वासा
प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
120. जलात राहुन माशांशी वैर करू नये
ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
121. जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला
निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
122. जळत घर भाड्याने कोण घेणार
नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
123. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसर्याच्या स्थितीत
आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
124. ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे.
125. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट जो
आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
126. जशी देणावळ तशी धुणावळ
मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
127. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे
एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
128. जी खोड बाळ ती जन्मकळा
लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
129. ज्याच्या हाती ससा तो पारधी
ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
130. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
131. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी
मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
132. झाकली मूठ सव्वा लाखाची
व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
133. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
134. टिटवी देखील समुद्र आटविते
सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
135. डोळ्यात केर आणि कानात फुंकर
रोग एक आणि उपचार दुसराच
136. डोंगर पोखरून उंदीर काढणे
प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
137. तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला
भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
138. तळे राखील तो पाणी चाखील
आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
139. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट
माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
140. ताकापुरते रामायण
आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
141. तोंड दाबून बुक्यांचा मार
एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
142. तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले
फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
143. कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे
पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
144. गाता गळा, शिंपता मळा
जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलल्याशिवाय येत नाही .
145. असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती.
नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.
146. अर्धी टाकून सगळीकडे धावू नये.
संबध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये.
147. अर्थी दान महापुण्य
गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
148.अन्नाचा येतो वास, कोरीच घेते घास.
अन्न न खाणे पण त्यात मन असणे.
149. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काल वाट पहावी लागते.
150. देखल्या देवा दंडवत
वरकरणी, खोटे खोटे केलेले स्वागत
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
credit www.mahasarav.com marathi mhani list,marathi mhani funny,marathi mhani 200,marathi mhani pdf,marathi mhani puzzle,marathi mhani va tyache arth,marathi mhani ani arth,marathi mhani on body parts,marathi mhani in english,10 marathi mhani,20 marathi mhani,lagna patrika marathi mhani,25 marathi mhani,marathi lagna patrika mhani,marathi 10 mhani,
0 Comments