UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

मातृ भाषेचे महत्त्व / मायबोली मराठी



 मातृ भाषेचे महत्त्व / मायबोली मराठी

“महाराष्ट्र” ही आमची माय भूमी आणि “मराठी” ही आमची मातृभाषा आहे. जन्मापासून मातृभाषेचे बाळकडू

कुटुंबा कडून पाजले जाते आणि आम्ही लहानाचे मोठे होते. पाळण्यात झोपून आई कडून ऐकलेले अंगाई गीत, आजी -

आजोबांकडून ऐकलेल्या चिऊ - काऊच्या गोष्टी मातृभाषेतूनच असतात. बोबड्या बोलातून गायलेले ये रे ये रे पावसा ...

, चांदोबा चांदोबा... हे गीत मोठे झाल्यावरही स्मरणात आहेच ना !!

व्यक्तीच्या जीवनात मातृभाषेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. मायबोली तून केलेल्या सुसंस्कारातून

व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. ज्ञानदेवांनी मातृभाषेचे महत्त्व जाणले होते म्हणूनच मराठीतून मांडलेले भगवद्गीतेचे

तत्वज्ञान समजून घेण्यास अवघड वाटत नाही. अनेक संतांनी कवींनी मातृभाषेतूनच काव्य रचना , अभंग रचना करून

समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. मातृभाषेतून आपले विचार रोखठोक पणे व विलक्षण तळमळीने व्यक्त करता येतात.

विचारांचे आणि भावनांचे आदान प्रदान मातृभाषेतून सहज व्यक्त करता येतात म्हणूनच शिक्षणाचे माध्यम

मराठीतूनच असले पाहिजे. आपली भाषा , आपले विचार थेट मनाचा ठाव घेतात. मराठी शब्दांत फार मोठे सामर्थ्य

आहे. शब्द थेट हृदयापर्यंत पोहोचतात आणि मेंदूला विचार प्रवृत्त करतात. समर्थ रामदास व्यक्तींची “उत्तम लक्षण”

सांगतात तेव्हा आदर्श त्वाच्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी कोरल्या जातात. सज्जनांचा सहवास

आणि सत्कर्माचे महत्त्व सांगताना “मोरोपंतांच्या” कविता थेट हृदयाला भिडतात.

विचार व्यक्त करायला आणि आपले विचार इतरांपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी आणि परिणाम कारक माध्यम

म्हणजे आपली मायबोली असते. मातृ भाषे मुळे आपली आकलन शक्ती , विचारशक्ती , कल्पना शक्ती व सृजनशीलता

विकसित होते. मराठीतून शिक्षण घेतलेल्या मुळे भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होतात. कविना, गीत, कृती या

मुळे आपले भावविश्व समृद्ध होते.

प्रारंभिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून असल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होती. भाषिक

घटकांवर आधारित, व्याकरण घटकांवर आधारित कृती, लेखन कौशल्ये अशा वैविध्यपूर्ण कृतीमधून ज्ञाना त भर पडून

मनोरंजक पद्धतीने घेतलेले शिक्षण व्यक्तित्व विकासात भर घालते. निरीक्षण क्षमता विचार क्षमता, कृती शीलता यांना

संधी मिळते. संधी मुळेच सुप्त गुणांना वाव मिळतो.

मराठी भाषेत म्हणी, वाक्प्रचार, शब्द समूह, सुभाषिते, अलंकार, समास, वृत्त यांचा लेखनात प्रभावीपणे

वापर करता येतो. घटना, प्रसंग स्वानुभव यांचे लेखन, स्वतः च्या विचारांची , कल्पनांची भर घालून पुनर्लेखन करता

येते. ऐकलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींचे शब्दांकन करता येते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मातृभाषा म्हणजे मराठीतून घेतलेले शिक्षण संपूर्ण, सर्वांगानी व्यक्तिमत्त्व

घडविते. म्हणूनच आमची मराठी भाषा हाच आमचा अभिमान आहे.👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈post Author : Smt. Vibha  Gundalwar. Vice Headmistress. shri Dadasaheb Dhanwatey  vidyalaya and Jr. College,  Mahal, Nagpur 

Post a Comment

0 Comments